जळगाव (प्रतिनिधी) – सावखेडा शिवारातील कांताई बंधाऱ्यावर काही तरूण अंघोळ करत असतांना लहान मुलाच्या भांडणावरून अनोळखी चार तरूणांनी एकाला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किशोर भास्कर नन्नवरे (वय-३५) रा. कढोली, ता. एरंडोल हे २२ ऑगस्ट रोजी मित्रांसह सावखेडा शिवारातील कांताई बंधारा येथे अंघोळीसाठी गेले. त्याठिकाणी दुपारी ३ वाजेच्या सुमारास लहान मुलांचे आणि किशोर नन्नवरे यांचे किरकोळ भांडण सुरू होते. त्यावेळी त्याठिकाणी उभे असलेले अनोळखी चार जणांनी काहीही कारण नसतांना किशोर नन्नवरे यांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. या मारहाणीत एकाने किशोर यांच्या हातावर उलटा कोयता हाणला. त्यात किशोर यांचा मोबाईलही गहाळ झाला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अनिल तायडे करीत आहे.







