मुंबई (वृत्तसंस्था) – बॉलिवूड अभिनेत्री ‘कंगना राणावत’च्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं दिसून येत आहे. मुंबईतल्या वांद्रे पोलीस ठाण्यात कंगना आणि तिची बहिणी रंगोली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश वांद्रे मजिस्ट्रेट कोर्टाने दिले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून कंगना आपल्या वादग्रस्त भूमिकांमुळे चर्चेत राहिली आहे.
कंगना विरोधात दाखल केलेल्या एका याचिकेमध्ये असं म्हंटलं आहे की, हिंदू कलाकार आणि मुस्लीम कलाकार यांच्यात मतभेद निर्माण करत कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून द्वेष वाढवला आहे. धार्मिक द्वेष पसरवल्याचा आरोप कंगनावर करण्यात आला आहे. यासंदर्भात आरोप करत याचिका दाखल करण्यात आली होती. मोहम्मद इकबाल सैयद असं याचिकाकर्त्याचे नाव आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, कंगना राणावत विरुद्ध आयपीसी कलम 156 (3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच गरज भासल्यास तिची चौकशी देखील केली जाईल. कंगना सातत्याने बॉलिवूडला आणि मुंबईला बदनाम करत असल्याचे दिसून येत आहे.