जळगाव शहरातील कांचन नगर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : येथील कांचन नगर परिसरातील रहिवासी तरुणाने राहत्या घरी कोणी नसताना छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समजून आले नाही. दरम्यान घटनेची संबंधित पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.
योगेश घनश्याम काळे (वय १९, रा.कांचन नगर, जळगाव)असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई आणि मामा यांच्यासह राहत होता मजुरी काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. (केसीएन) दरम्यान रविवारी दि. ४ मे रोजी दुपारी घरी कोणी नसताना त्याने छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली. कुटुंबीयांना कळताच त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून घोषित केले.
यावेळी कुटुंबीयांनी व मित्रांनी मन हेलावणारा आक्रोश केला. दरम्यान या घटनेमुळे कांचन नगर परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेची संबंधित पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.