जळगाव ( प्रतिनिधी ) – कानळदा रोडवर भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकास लीलाधर चौधरी ( वय ५२ रा आव्हाणे ता. जळगाव ) हे जखमी झाले आहे. विकास चौधरी व त्यांची पत्नी वंदनाबाई ३ जानेवारीरोजी त्यांच्या एम.एच.१९ ऐ.वाय ५८१६ या क्रमांकांच्या दुचाकीने चोपड्याकडे जात होते. कानळदा गावाजवळ एम.एच.४८ ए.टी. १३३९ या क्रमांकाच्या कारने विकास चौधरी यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात विकास चौधरी यांच्या उजव्या पायाला, कमरेला व हाताला गंभीर दुखापत झाली दुचाकीचेही नुकसान झाले . अपघातानंतर कार सोडून चालक घटनास्थळाहून पसार झाला होता. जखमी विकास चौधरी यांच्या पत्नी वंदना चौधरी यांच्या तक्रारीवरुन कारचालक रविंद्र रामा कुंभार याच्या विरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.