चोपडा;- तालुक्यातील कामलगाव येथे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कायक्रम अंतर्गत हिवताप प्रतिरोध महिना साजरा करण्यात येत आहे . या मोहिमेत जनतेच्या सहभागातून हिवताप विषयी जनजागृती करण्यात येत आहे. या मोहिमेत प्रमुख भाग म्हणजे ताप सर्वेक्षण करणे,गटारी वाहत्या करणे,पाण्याची दापकी वाहत्या करणे, गप्पिमासे सोडणे हे उपक्रमाव्दारे करण्यात येत आहे गप्पिमासे हे जंतू डासांची अंडी नष्ट करतात तसेच आजारांवर म्हणी लिहिणे कंटेनर सर्वेक्षण करणे अश्या प्रकारचे कार्यक्रम राबवून जनतेला आरोग्य शिक्षण देणे तसेच प्रतरोध उपाय योजनेच्या अमलबजावणी मध्ये त्याचा सक्रिय सहभाग प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने गावातील जणते पर्यंत या उपक्रमा द्वारे माहिती पोहचवण्याचा प्रयत्न करणे या मोहिमेचा प्रमुख उदिष्ट आहे .
जनतेच्या लोकसहभागातून मागील दोन, तीन वर्षात मलेरियाच्या एकही रुग्ण आढळून आलेला नाही त्यामुळे हिवतापाच्या निर्मूलनाकडे वाटचाल सुरु आहे.
सदर मोहीम यशस्वितेसाठी जिल्हा आरोग्यअधिकारी डॉ. श्री जमादार तसेच जिल्हा.हिवताप अधिकारी डॉ.श्रीमती अपर्णा पाटील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप लासुरकर प्राथमिक आरोग्य केंद्र अडावद चे वैद्यकीय अधिकारी डॉ.श्री.विष्णु प्रसाद डायमा व सह्यक अधिकारी श्री.प्रकाश पारधी याच्या मार्ग दर्शना खाली आरोग्य सेवक डॉ. महेंद्र पाटील आरोग्य सेविका श्रीमती उज्वला परदेशी व आशा स्वयं सेविका संगीता न्हायदे आदी प्रयत्न करीत आहेत.