जळगाव ( प्रतिनिधी ) – आज खान्देश मराठा पाटील मंडळ, कल्याण (प.) मुंबई येथे आयोजित वधु- वर सूचक मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने (पाटील) भेट दिली.
यावेळी रवी पाटील ( अध्यक्ष खा.म.पा.मंडळ कल्याण व माजी .नगरसेवक शिवसेना) , देविदास मोरे ( संस्थापक खा.म.पा.मंडळ कल्याण) , वैशाली पाटील ( कल्याण डोंबिवली महापालिका ) , ज्योती पाटील ( नगरसेविका उल्हासनगर महापालिका .) , नरेंद्र पाटील ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कल्याण ) , रावसाहेब बोरसे ( परिवहन अधिकारी ) , दिनेश सोनवणे ( सहाय्यक पोलिस निरीक्षक, कल्याण) आदी मान्यवर उपस्थित होते . या कार्यक्रमाचे आयोजक- खान्देश मराठा पाटील मंडळ ( कल्याण) हे होते.