चोपडा ( प्रतिनिधी ) – कोरोना साथीमुळे गेल्यावर्षी रद्द करण्यात आलेल्या कमळगाव चांदसनीच्या काळभैरव यात्रेला यंदा प्रशासनाने परवानगी दिली आहे
यंदाच्या यात्रेच्या नियोजनासाठी आयोजित आढावा बैठकीचे अध्यक्ष तहसीलदार अनिल गावित होते तसेच अडावद पोलीस स्टेशनचे एपीआय किरण दांडगे , महावितरणचे चौधरी , आरोग्य अधिकारी डॉ लासुरकर, कालभैरव संस्थानचे अध्यक्ष दिलीप बाविस्कर , उपाध्यक्ष सुरेश पाटील , सचिव शालीग्राम पाटील यांच्यासह चांदसनी आणि कमळगावचे सरपंच , उपसरपंच आणि ग्रामपंचायतीचे सभासद , चांदसनीचे पोलीस पाटील व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष या बैठकीत उपस्थित होते कोरोनाचे काटेकोरपणे नियम पाळून सर्व भक्तांना यात्रेसाठी येतांना लस आणि मास्क बंधनकारक असेल असे सांगण्यात आले.