नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- देशात करोनाचा थैमान थांबायच नाव घेत नाही. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहेत. तसेच व्हेंटिलेटर्स देखील कमी पडत आहेत. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे देशात करोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. अशातच ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ज्येष्ठ संशोधक प्रा. डॉ. भालचंद्र काकडे यांचा चेन्नईत मृत्यू झाला.
वृत्त माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई येथील एसआरएम रिसर्च इन्सिट्युटमध्ये डॉ. काकडे कार्यरत होते. या दरम्यान कोविड रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर दोन तीन दिवसांतच त्यांना श्वसनास त्रास सुरू झाला. यानंतर शासकीय कोविड सेंटरमध्ये दाखल केले. त्यांना ऑॅक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधे उपलब्ध करून देण्यासाठी सर्वानी धडपडत केली मात्र त्यांचाच ऑक्सिजन अभावी त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, डॉ. काकडे मूळचे कोल्हापुर चे असून त्यांनी शिवाजी विद्यापीठातून रसायनशास्त्राची पदवी घेऊन फेलोशीप मिळवून पुण्यातील रासायनिक प्रयोगशाळा, जपानमधील टोकियो इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये इंधननिर्मितीबाबत संशोधन केले. त्यातून निर्माण होणार्या सकारात्मक ऊर्जेने रेल्वे धावू शकेल, याचा ध्यास घेतला. वीस वर्षे त्यांनी या संशोधनात व्यतित केली.
ऑक्सिजन, हायड्रोजन अशा वायूंपासून इंधनपुरक ऊर्जा निर्माण करून त्याव्दारे रेल्वेही धावू शकेल, असे संशोधन त्यांनी सुरू केले. इंधननिर्मिती व प्लॅटिनमच्या विविध संशोधनात आंतरराष्ट्रीय स्तरावर सात पेटंटही मिळवले आहे.