मराठा सेवा संघ, संभाजी बिग्रेडचा उपक्रम
पाचोरा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील श्री क्षेत्र काकनबर्डी चंपाषष्ठी यात्रेनिमित्त पाचोरा मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड तर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सदर पाणपोईचे उद्घाटन राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करतेवेळी प्रकाश संतोष पाटील, पीएसआय सुनील पाटील, मराठा सेवा संघाचे माजी तालुकाध्यक्ष दीपक हरी पाटील, संभाजी ब्रिगेडचे राजेंद्र सुखदेव पाटील, रवींद्र पाटील, किरण पाटील, समर्थ पाटील, गजमल पाटील, शिवदास पाटील, रोहिदास पाटील, मच्छिंद्र पाटील, प्रवीण पाटील देवस्थानचे ट्रस्टी भूषण देशमुख रवींद्र देशमुख इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते
पाचोरा येथील देशमुख परिवार व पाटील परिवार यांचं कुलदैवत असलेले श्री क्षेत्र काकणबर्डी येथील श्री खंडेराव महाराज देवस्थान या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षापासून यात्रा भरवण्यात येते. पाणपोईसाठी लागणारा संपूर्ण खर्च दीपक हरी पाटील गेल्या अनेक वर्षापासून वैयक्तिक स्वरूपात यंत्रणा राबवत असतात. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते जितेंद्र देवर उपस्थित होते.