जळगाव (प्रतिनिधी) :- के.बी.एस.समाजमंदिर येथे राजमाता जिजाऊ व राष्ट्रीय युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी प्रतिमेस मान्यवरांनी माल्यार्पण केले.
संस्थेचे जेष्ठ सदस्य मोहन गारूंगे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या चरित्रविषयी माहिती सांगितली. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोहन चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष सचिन बाटूंगे, कार्यध्यक्ष शशिकांत बागडे यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय दहियेकर, उपाध्यक्ष प्रदीप नेतलेकर, सचिव राहुल नेतलेकर, खजिनदार योगेश बागडे, क्रांती बाटूंगे, विजय अभंगे, उमेश माछरेकर, संदीप बागडे, पंकज गागडे, राहुल दहियेकर, सोनू रायचंदे, जितू नेतले,विनय नेतले, अभय गारूंगे, आशु चव्हाण, अंकुश माछरे, कपिल बागडे, प्रितेश नेतले, जितू घमंडे, अर्जुन मलके आदी समाजबांधव उपस्थित होते.