जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील जिल्हा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाली. त्यांचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या कारागृह पोलीस कर्मचाऱ्याला एकाने चावा घेतला. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्हा कारागृहात अमोल सोनवणे (मराठे) (वय-29, रा. खेडी ब्रुदूक ) खूनाच्या गुन्ह्यात कैदी आहे. गुरुवारी कारागृह अधीक्षक अनिल वांढेकर गस्त घालत होते. यावेळी कैदी सोनवणे त्याच्या बॅरेकच्या बाहेर निघुन त्याने बॅरेक 9 मध्ये जावुन टिव्ही लावला. यावेळी न्यायबंदी समाधान शेवाळे याने अमोल याला तू आमच्या बॅरेक मध्ये कशासाठी आला, येथे आमचे साहित्य चोरीला जाते असे सांगीतल्यावरुन वादाला सुरुवात झाली.
या वादात टिव्ही फोडण्याची धमकी देत, टिव्हीचा रिमोट तोडला. अमोल याचा मित्र तेजस सोनवणे याच्यासह चेतन सोनार वादात पडल्यानंतर वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. हाणामारी झाल्यावर कारागृह पोलीस कर्मचारी निवृत्ती पवार, सुभाष खरे व तुरूंगाधीकारी धावत आले. अमोल सोनवणेला धरुन भांडण सोडवून नेत असतांना त्याने कारागृह अधीकार्यांशीच वाद घातला. हाणामारी थांबवुन अमोल सोनवणे याला अधीक्षकांच्या सांगण्यावरुन बॅरेक मध्ये बंद करण्यास नेत असतांना त्याने कर्मचारी दत्ता खोत, रोशन लहुगिरी, निवृत्ती पवार सुभाष रोकडे यांच्याशी झटापट केली. या झटापटीत दत्ता खोत या कर्मचार्याच्या हाताला कडाडून चावा घेतला. खोत यांच्यावर उपचार करुन जिल्हापेठ पेालिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.