• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कचरा निर्मूलन वेळेवर, शिस्तबद्ध पद्धतीने करा अन्यथा करणार कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 17, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कचरा निर्मूलन वेळेवर, शिस्तबद्ध पद्धतीने करा अन्यथा करणार कारवाई

दुसऱ्या दिवशीही भेटीचा धडाका सुरू, महापौरांनी घंटागाडी केंद्रावर कर्मचाऱ्यांच्या व्यथा घेतल्या जाणून !

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील विकास कामांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी मंगळवारी, १७ फेब्रुवारी रोजी सकाळी पुन्हा एकदा भेटीचा धडाका कायम ठेवला. महापालिकेच्या जुन्या टीबी हॉस्पिटल परिसरातील घंटागाडी केंद्राला त्यांनी अचानक भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. यावेळी महापौरांनी थेट कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता, कर्मचाऱ्यांनी समस्यांचा पाढाच महापौरांसमोर वाचला. केंद्रावरील पाहणीदरम्यान महापौरांना अनेक त्रुटी आणि कर्मचाऱ्यांच्या गंभीर अडचणी दिसून आल्या.


वाहनांमध्ये डिझेल नेहमी कमी असते, कॉन्टॅक्टर वेळेवर उपस्थित नसतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळत नाही. अनेकदा लागणारा दंड आमच्या पगारातूनच भरला जातो, अशी तक्रार कर्मचाऱ्यांनी केली. शहरात घंटागाडी काही ठिकाणी येते तर काही ठिकाणी जात नाही, अशा तक्रारींवर महापौरांनी विचारणा केली असता कर्मचाऱ्यांनी तांत्रिक अडचणी सांगितल्या.

कचरा खाली करण्यासाठी कॉम्पॅक्टर यंत्राकडे जावे लागते, तिथे वाहन रिकामे होण्यासाठी खूप वेळ लागतो. या रांगेमुळे नियोजित कॉलनीमध्ये कचरा संकलनासाठी वेळेवर पोहोचता येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी वाहनांच्या उपलब्धतेबाबतची माहितीही समोर आली. शहरात सध्या ८३ जुन्या आणि २१ नवीन अशा एकूण १०४ घंटागाड्या आहेत, त्यापैकी ८८ गाड्या प्रत्यक्ष कार्यरत आहेत. तर १६ गाड्या ब्रेक डाऊन स्थितीत आहेत. ७ जुने आणि ६ नवीन असे एकूण १३ कॉम्पॅक्टर असून त्यातील ८ सध्या सुरू आहेत. याशिवाय ९ पिकअप, ६ डम्पर आणि ३ स्किप लोडर अशी यंत्रणा शहरात तैनात आहे.

या सर्व प्रकाराची दखल घेत महापौर दीपमाला काळे यांनी बीव्हीजी कंपनीचे प्रोजेक्ट हेड विनोद रेड्डी यांच्याकडून कामाचा जाब विचारला. “शहरातील कचरा निर्मूलन वेळेवर आणि शिस्तबद्ध पद्धतीने झालेच पाहिजे. कामे जर वेळेवर झाली नाहीत, तर प्रसंगी तुमच्यावर कठोर कारवाई केली जाईल,” असा कडक इशारा महापौरांनी यावेळी दिला. शहराची स्वच्छता राखण्यासाठी मला घंटागाडी केंद्रामध्ये शिस्त लावावी लागेल, असा दमही त्यांनी प्रशासकीय  अधिकाऱ्यांना भरला.


 

 

Tags: #jalgaon manpa news
Previous Post

धक्कादायक : पैसे देण्यास नकार दिल्याने पित्याचा काठीसह बेल्टने झोडपून केला खून !

Next Post

 दूध विक्री केंद्राला लागलेल्या आगीत साहित्य जळून खाक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

 दूध विक्री केंद्राला लागलेल्या आगीत साहित्य जळून खाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल
1xbet russia

एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी, ६ लाखांचे दागिने लंपास

February 17, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

किरकोळ कारणावरून राडा; लाकडी दांडक्याने मारहाण करत धमकी

February 17, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

जळगावात भरदिवसा घरफोडी; ४ लाखांचा मुद्देमाल लंपास

February 17, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

 दूध विक्री केंद्राला लागलेल्या आगीत साहित्य जळून खाक

February 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल

एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी, ६ लाखांचे दागिने लंपास

February 17, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

किरकोळ कारणावरून राडा; लाकडी दांडक्याने मारहाण करत धमकी

February 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon