जळगावातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : लग्नात झालेल्या भांडणाच्या कारणावरुन एका तरुणाला तिघांनी शिवीगाळ करीत दगडाने मारहाण करीत जखमी केले. ही घटना दि. ३० मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पिंप्राळा हुडको परिसरात घडली. याप्रकरणी शुक्रवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील मेहरुण परिसरात आवेज शेख अब्बास (वय २१) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गुरुवार दि. ३० मे रोजी दुपारी साडेतीन वाजता आवेज पिंप्राळा हुडको परिसरात कामाच्या निमित्ताने आलेला होता. त्यावेळी लग्नात झालेल्या भांडणाच्या कारणावरून रईस शेख बबलू, तात्या शेख आणि सोहेल शेख सलीम (तिघे रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) यांनी दगडाने मारहाण करून गंभीर दुखापत केली. या घटनेबाबत रईस शेख बबलू याने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक चंद्रकांत पाटील हे करीत आहे.