पिंप्राळ्याच्या गणपती नगरातील घटना, गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील पिंप्राळा भागातील गणपती नगरात जुन्या वादातून महिलेला पोलीस कर्मचाऱ्यांकडून शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिल्याचा प्रकार बुधवारी १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता घडली आहे. याप्रकरणी दुपारी १ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात दोघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयश्री योगेश खडके (वय-३६, रा.गणपती नगर पिंप्राळा, जळगाव) या आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे पोलीस कॉन्स्टेबल कमलाकर राजहंस आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल मधु सुरेश तिवाणे दोन्ही रा. गणपती नगर, पिंप्राळा, जळगाव यांच्यासोबत जुना वाद होता. या जुन्या वादातून पोलीस कॉन्स्टेबल कमलाकर राजहंस आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल मधु तिवाणे यांनी दोघांनी जयश्री खडके यांना शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली. ही घटना १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता घडली. दरम्यान महिलेने दुपारी १ वाजता रामानंदनगर पोलिसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार दोघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भूषण जैतकर करीत आहे.