जळगाव शहरातील मेहरूण भागातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : जुनी कार खरेदी करण्याच्या मोबदल्यात मेहरूण येथे एकाची ७ लाख ५० हजार रुपयांची रोकड घेऊन फसवणुक केल्याची घटना गुरूवारी दि. २५ एप्रिल रोजी उघडकीस आली. याप्रकरणी दुपारी १ वाजता फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील मेहरुण परिसरात असलेल्या हाजी अहेमद नगरातील रहिवासी अल्ताफ बेग शमशेर बेग मिर्झा (वय- ४५) यांनी फिर्याद दिली आहे. नोव्हेंबर २०२१ ते डिसेंबर २०२१ रोजी दरम्यान, ते मुंबई येथील एका बॅकेकडून मोठ्या प्रमाणात जुनी कार खरेदी करणार होते. त्यासाठी दीपक संजयराव देशमुख यांनी अल्ताफ बेग यांचा विश्वास संपादन करुन त्यापोटी त्यांच्याकडून ७ लाख ५० हजार रुपये घेतले होते. परंतु अद्यापपर्यंत त्यांना एकही जुनी कार दिली नाही.