जंकफूड या शब्दाचा उपयाेग सर्वात प्रथम १९७२ मध्ये केला गेला हाेता. अधिक कॅलरी आणि कमी पाेषक तत्त्वांच्या खाद्यपदार्थांकडे लाेकांचे ध्यान आकर्षित करणे हा याचा उद्देश हाेता.काळाबराेबर लाेकांत यांच्याप्रती रूची वाढली. परंतु उत्पादन करणाऱ्यांवर याचा खास असर दिसून आला नाही.जंकफूड बनविण्यात कमी वेळ लागताे आणि हे जवळ ठेवण्यात ही साेपे असते.
जंकफूडमध्ये अत्याधिक कार्बाेहायड्रेट फॅटस् आणि शर्करा असते. जंकफूडच्या अधिक सेवनाने लाेक हृदयसंबंधी राेग, मधुमेह आणि लठ्ठपणा यांसारख्या राेगांनी ग्रासित हाेतात. मागील दहा वर्षांपासून भारतामध्ये या राेग्यांच्या संख्येमध्ये फार वाढ झाली आहे.
जंकफुड म्हणजेच फास्टफूड महिलांसाठी फार हानीकारक आहे. याच्या सेवनाने महिलांमध्ये हार्माेनची कमतरता हाेते. जंकफूडचा हानीकारक प्रभाव पाहून कित्येक देशांनी यांच्या जाहिरातींवर नियंत्रण आणि निगराणीची व्यवस्था केली आहे.निराेगी शरीरासाठी संतुलित आहार आवश्यक आहे. जंकफूडमध्ये अधिक कार्बाेहायड्रेड, फॅटस् व शर्करा असते. स्वास्थ्याच्या दृष्टीने हे हानीकारक असतात.