जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील रायपूर गावामध्ये प्राथमिक शाळेच्या भिंतींच्या आडोश्याला झन्ना-मन्ना जुगार खेळतांना एमआयडीसी पोलिसांनी धडक कारवाई करीत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर डापकर, सचिन मुंढे, सतीश गर्जे, चंद्रमोहन सोनवणे यांनी रायपूर गावी धाड टाकली. येथील प्राथमिक शाळेजवळ काही इसम गोलाकार बसून झन्ना-मन्ना नावाचा पत्त्याचा खेळ खेळतांना दिसले त्यानुसार शनिवारी दुपारी १५. ४५ वाजेच्या सुमारास पाच इसमांना अटक करण्यात आली. त्यात विशाल भागवत सुरवाडे (रा. रायपूर), धनसिंग भोंदू राठोड (रा. सुप्रीम कॉलोनी,जळगाव), राकेश संजय पाटील, दिनेश भास्कर खैरनार, गणेश शिवाजी शिंदे (सर्व रा.कुसुबा) यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून १,२६० रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्यावर जुगार अधिनियम, कलम-१२ (अ) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.