मुक्ताईनगर डीवायएसपी पथकाची धडक कामगिरी
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर-ब-हाणपूर रस्त्यावरील नायगाव फाट्यावर सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर मुक्ताईनगरचे पोलीस उपअधीक्षक राजकुमार शिंदे यांच्या नेतृत्वातील पथकाने छापा टाकत ६ जुगारींना गजाआड करीत १ लाख ४७ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ६ जणांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाईने अवैध धंदे चालकांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. पोलीस कॉन्स्टेबल राजेश महाजन यांनी फिर्याद दिल्यावरून शांताराम जीवराम मंगळकर (५०, बऱ्हाणपूर), गणेश वसंत पाटील (४४, पूर्णाड ता. मुक्ताईनगर), महेंद्र बापूराव नाईक (३५, जुने गाव, मुक्ताईनगर), युवराज संतोष महाजन (३७, निंभोरासीम, ता. रावेर), सुनील किसन बेलदार (३३, कुन्हा, ता. मुक्ताईनगर), राजेश सीताराम वाकोडे (५०, बाबासाहेब आंबेडकर नगर, नांदुरा) या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर जाणाऱ्या रोडवरील टोल नाक्याजवळील साईराज ढाब्यामागील एका हॉलमध्ये झन्ना-मन्ना नावाचा जुगाराचा खेळ खेळताना ही कारवाई करण्यात आली.
संशयीतांकडून १ लाख ४७ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई डीवायएसपी राजकुमार शिंदे व पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सागर सावे, राजेश महाजन, विशाल पवार, संतोषकुमार भारूडे, प्रशांत चौधरी यांच्या पथकाने केली.