जळगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी अनिल गुलाबराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल पाटील यांनी याबाबत नियुक्तीपत्र दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशान्वये राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी अनिल गुलाबराव पाटील यांनी नियुक्ती केली आहे. जिल्ह्यातील पदवीधर संघाच्या पक्ष संघटनेसाठी तसेच पदवीधरांच्या उन्नती व विकासासाठी, पक्ष वाढीसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील वाटचालीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रभैय्या पाटील, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, ॲड. कुणाल पवार यांनी नियुक्तीबद्दल अभिनंदन केले आहे.