जळगाव (प्रतिनिधी) – बाफनाजी उद्योजक होते. मात्र समाजिक कार्यात ते नेहमी सरळहाताने मदत करीत राहिले विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके एखाद्या रुग्णाला जर दवाखान्यात मदत लागत असेल तर त्यांना आर्थिक मदत करत होते. गुजरातच्या भूकंपाच्या वेळेस भरपूर मदतीची शिदोरी घेऊन बाफनाजीनी त्याठिकाणी लोकांना मदत कार्य केलं होतं भूकंप असो नैसर्गिक आपत्ती असो अतिवृष्टी असो प्रत्येक वेळेस मदत करताना बाफनाजी कधीही आखडता हात घेतला नाही. समाजाला नेहमी त्यांनी सरळ हाताने मदत केलेली आहे.

गोरक्षाच्या संदर्भात त्यांचे विचार खूप वेगळे होते त्यामुळे देशातील एक नामांकित गोशाळा त्यांनी सुरू केली मुक्या प्राण्यांच्या हत्या होऊ नये म्हणून त्यांनी शाकाहाराचा प्रचार प्रसार सर्वत्र केला. अनेक लोकांना शाकाहारी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांच्या जाण्याने समाजात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे व्यापाराच्या माध्यमातून त्यांनी भरपूर पैसे कमावले पण सामाजिक दातृत्व त्यांनी चांगले जोपासले. गुजरात, मराठवाड्यातील भूकंपात त्यांनी ब्लॅंकेट, कपडे, पैसे घेऊन स्वतः वाहन घेऊन मदत करायला गेले होते. शाळकरी विद्यार्थ्यांपासून गरिबांना मदत केली. मुक्तहस्ते त्यांनी मदत केली. त्याला तोडच नाही. वैद्यकीय क्षेत्रात मदत करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.माणूस पैसे कमावतो, पण दान द्यायची जी वृत्ती लागते ती खूप मोठी होती. अहिंसावादी, शाकाहार प्रेमी, गोप्रेमी बाफनाजी होते. व्यापार सोडून ते समाजकार्यासाठी गावभर फिरायचे. दानशूर व्यक्तिमत्त्व समाजातून हरपले आहे. त्यांचे औदार्य, मनाची श्रीमंती मोठी होती.
रतनलाल सी बाफना हे जळगाव सुवर्णनगरीतील एक प्रसिद्ध असे नाव होते. त्यांनी समाजातील अनेक व्यक्तींना पैशांची, वस्तूंची मदत करून सामाजिक दातृत्व जोपासले आहे. त्यांच्या जाण्यामुळे सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बाफनाजी यांना महाजन परिवार, जी एम फाउंडेशन परिवारातर्फे तसेच भारतीय जनता पक्षाच्या वतीने विनम्र आदरांजली.
– आ.गिरीश महाजन माजी मंत्री







