पुणे – पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुरात चार तरुण वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. दौंड तालुक्यातील राजेगावमध्ये ही घटना घडली आहे.

हे तरुण दोन दुचाकीवरुन ओढ्यातून चालले होते. भिगवण येथून दौंडकडे जात असताना राजेगावच्या चोपडे वस्तीजवळील ओढ्यात ते वाहून गेले आहेत. तिघांचे मृतदेह हाती लागले असून एकाचा शोध सुरु आहे. तरुणांची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरु आहे. पुणे शहर आणि परिसरात बुधवारी पावसाने कहर केला. दिवसभर कमी-अधिक प्रमाणात सुरू असलेल्या पावसाने रात्री साडेआठनंतर रौद्ररूप धारण केल्याने सखल भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरलं.







