जळगाव;- खेडी येथे अवैधरित्या मद्याची विक्री करणाऱ्याला एमआयडीसी पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली .
तालुक्यातील खेडी गावात पाटील वाडा चौकात असलेल्या जगदंब टेंट हाऊस जवळ संशयित आरोपी संजय भास्कर पाटील (वय-४२) रा. पाटील वाडा, खेडी ता.जि.जळगाव हा एका पाढऱ्या गोणीत देशी-विदेशी दारू विक्री करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. त्यानुसार शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास कारवाई करत त्याच्या ताब्यातील १४ हजार रूपये किंमतीचे मॅकडॉल व्हिस्की आणि ९८० रूपये किंमतीची इंम्पेरियल ब्ल्यू दारूच्या बाटल्या असा एकुण १४ हजार ९८० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पोहेकॉ मुद्दसर काझी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांचा कारवाईत सहभाग
पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. आनंदसिंग पाटील, स.फौ. अतुल वंजारी, स.फौ. रामकृष्ण पाटील, पोकॉ असीम तडवी, पो.कॉ. इम्रान सैय्यद, पोकॉ निलेश पाटील यांनी ही कारवाई केली.