जळगाव ;- शहरातील शाहू नगरातील तपस्वी हनुमान मंदिराच्या पुजाऱ्यांनी दोन जणांविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. मात्र याची दखल घेतली न गेल्याने मुख्यालयात कार्यरत असणाऱ्या पोलिसानेच दबंगिरी दाखवत तक्रारीत नमूद गोलू नामक तरुणाला बेदम झोडपण्यास सुरुवात केली . मात्र हा प्रकार लक्षात येताच याकूब बांगी आणि सलीम शेख अशा दोघांनी आवरले . मात्र तरुणांसह काही मंडळी पोलीस स्टेशनला आल्यावर त्या दबंग पोलिसाने संतोष शेळके नामक व्यक्तीला जोरदार चपराक दिली . हा प्रकार पोलीस निरीक्षकांसमोर घडल्यावरदेखील ते गप्पगार असल्याचे दिसून आले . यानंतर शेळके यांनी पोलिसासह पुजाऱ्यावरही गुन्हा नोंदविला आहे . या प्रकारची चर्चा आज या परिसरात जोरदार घडल्याने ‘दबंगगिरी ‘ करणारा पोलीस कोण ? यावर चर्चा रंगली होती .
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , तपस्वी हनुमान मंदिराचे पुजारी बालक सरजुदास (वय-28)यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे कि , शुक्रवार(ता.22) रोजी रात्री 9:30 वाजता गोलू वाडकर आणि दिलीप आसारेयांनी पुजाऱ्याला शिवीगाळ करून या मंदिरातून निघून जा, नाहीतर, तुम्हाला मारून-मारून हकलून लावू अशी धमकी दिल्या प्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र तक्रारीची दखल घेतली न गेल्याने आज सकाळी मुख्यालयात कार्यरत दबंगगिरी करणाऱ्या पोलिसाने गोलू नावाच्या तरुणाला हनुमान मंदिरा जवळून सिनेस्टाईल झोडपत नेऊ लागला . गणवेशात असल्याने पाहणारेही स्तब्ध झाले होते . शाहूनगर मशिदीचे याकूब बांगी आणि सलीम भाई अशा दोघांनी पोलिसाच्या तावडीतून या तरुणाला वाचवून शहर पोलिसांना फोन करून बोलावले. सुधीर साळवेसह एक कर्मचारी येऊन मारहाण झालेल्या तरुणाला बसवून पोलिस ठाण्यात घेऊन आले.
या घटनेची माहिती कळताच माजी नगरसवेक विजय वाडकर, संतोष शेळके, मनोज राणे, सरदार तडवी, याकूब बांगी, सलीम शेख आदींनी पोलीस स्टेशनला धाव घेतली .पोलीस निरक्षकांशी चर्चा करीत असताना दबंगगिरी करणाऱ्या पोलिसानेच संतोष शेळके यांच्यावर हात उगारून कानशीलात लगावली. पोलिस ठाण्याच्या आवारात झटापटीचे चित्रण करण्यासाठी कॅमेरा काढणाऱ्या प्रतिनिधींवर हा दबंग पोलिस धावून गेला . या बाबत निरीक्षक अरुण निकम यांनीही कानावर हात ठेवत तुम्हीही तक्रार द्या असे सांगत उफराटा सल्ला दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
संतोष एकनाथ शेळके(वय-47) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केल्या प्रमाणे, तपस्वी हनुमान मंदिरा जवळून वावरु नये म्हणून बालक महाराज (तपस्वी हनुमान मंदिर)आणि दबंगिरी करणाऱ्या दोघांची तक्रार दिली आहे.