पाचोरा शिवसेनेतर्फे तहसिलदार यांना निवेदन
पाचोरा (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने तातडीने पेट्रोल डिझेल दरवाढी मागे घ्यावी, अन्यथा पाचोरा तालुका शिवसेना व युवासेना महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा तीव्र इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
केंद्र सरकार वारंवार पेट्रोल-डिझेल दरवाढ करत असल्याने दळवळणाच्या साधनांवर त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे. त्यामुळे जनतेचे कंबरडे मोडले गेले. त्यामुळे पाचोरा शिवसेनेतर्फे पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, प्रवासाचा खर्च वाढला, जीवनावश्यक वस्तूंचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढले ,त्यामुळे महागाईच्या कचाट्यात सामान्य नागरिक होरपळुन निघत आहे. कोरोनाच्या महाभयंकर आजारातुन अद्याप पर्यंत जनता जनार्दन सावरले नाहीत. उद्योग धंदे अजून सुरू नाहीत. कसं जगावं संसार कसा चालवावा असा प्रश्र्न जनतेसमोर उभा आहे. त्यात भरीस भर म्हणुन केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे भाव वाढवुन जनतेची गळचेपी करीत आहे.
केंद्र सरकारने तातडीने पेट्रोल डिझेल दरवाढी मागे घ्यावी अन्यथा पाचोरा तालुका शिवसेना व युवासेना महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा तीव्र इशारा लेखी निवेदनाद्वारे -शिवसेना मा.उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर, युवानेते सुमित पाटील, जि.प सदस्य रावसाहेब पाटील, पदमबापु पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, जावेद शेख, संदिप पाटील, सौरभ चेडे, महिला आघाडीचे पदाधिकारी सुषमा पाटील, मंदा पाटील, उर्मिला शेळके,किरण पाटील,स्मिता बारवकर,मिना पाटील, कल्पना पाटील, अरूणा पिंगळे, रंजना पाटील, सुनंदा पाटील ,प्रिती सोनवणे, जया सुरवडकर, गिता मोरे, आशा दांडगे, बापु हटकर, दादाभाऊ चौधरी, मयुर महाजन, संतोष हटकर, अण्णा चौधरी, पवन पाटील, सागर पाटील, पप्पु जाधव, सुधाकर महाजन, जितेंद्र पेंढारकर, बंडु चौधरी, गजु पाटील, मोहन राजपुत , राजु परदेशी, गणेश देशमुख, छोटु चौधरी, नितीन पाटील, विजय भोई आदी उपस्थित होते.







