• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जीवरक्षक ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 25, 2026
in जैन कंपनी, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, नवी दिल्ली, भारत, महाराष्ट्र, मुंबई, विश्व
0
जीवरक्षक ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार

ओम आणि त्याच्या भावाच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च जैन फाऊंडेशन करणार

जळगाव, (प्रतिनिधी) – पोहता येत नसतानाही अनेर नदीत आंघोळीसाठी उतरलेल्या चौघासाठी उमेश उर्फ ओम रवींद्र पाटील (वय 14 )  हा देवदूत ठरला आहे. ओम याच्या धाडसामुळे चौघांचे प्राण वाचले. ओम याच्या या धाडसाची दखल घेत जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड व भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या वतीने त्याच्या शिक्षणाचा सर्व खर्च करण्याचा निर्णय जाहीर केला होता. आज (२५ मार्च) ओम पाटील याचा व त्याचा परिवाराचा जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ओम याच्या भावाचाही शैक्षणिक खर्च उचलण्याचा निर्णय अशोक जैन यांनी जाहीर केला.

अनेर नदीत गणपूर ( चोपडा ) येथील चार अल्पवयीन मुले ( वय 16 )  आंघोळीसाठी उतरले होते. त्यांना पोहता येत नसल्याने ते बुडू लागले.  मुलांची आरडाओरड ऐकताच जवळच असलेल्या ८ वीत शिकणाऱ्या ओमने क्षणाचाही विलंब न लावता नदीत उडी घेतली. आपल्या जिगरबाज वृत्तीने त्याने एकामागून एक अशा चौघांनाही सुखरूप बाहेर काढले. त्याच्या या अचाट धैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. जैन इरिगेशनच्या भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनने ओम याचा सर्व शैक्षणिक खर्च करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर २५ मार्च रोजी त्याला जैन हिल्स येथे बोलवून त्याचा व आई-वडिलांचा सत्कार केला. यावेळी सोबत परिवारातील सदस्य व अ‍ॅड. बाळकृष्ण पाटील ही होते. अशोक जैन यांनी ओम याच्या पालकांशी संवाद साधत त्याच्या धाडसाचे कौतूक केले. ओम याचा भाऊ दिवेश हा अकरावीत शिक्षण घेत आहे, त्याचाही  शैक्षणिक खर्च करण्याचा निर्णय जाहीर केला. ” ओमचे धाडस अफाट आहेच, पण त्याच्यावर झालेले संस्कार त्याहून मोठे आहेत,” अशा शब्दांत अशोक जैन यांनी त्याचे कौतुक केले.

ओम आठवीच्या वर्गात शिकत आहे. ओमचे वडील रवींद्र पाटील आणि आई सरलाबाई हे शेतमजुरी करतात. त्याची परिस्थिती साधारण आहे. आर्थिक परिस्थितीमुळे मुलांच्या शिक्षणाची त्यांना चिंता होती. परंतु भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या वतीने दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च करण्याचा निर्णय घेतल्या गेल्यामुळे पाटील दाम्पत्यांनी समाधान व्यक्त केले.

फोटो ओळी-  ओम पाटील याचा सत्कार करताना अशोक जैन, सोबत अ‍ॅड. बाळकृष्ण पाटील,  स्वरुप लुंकड, रवींद्र पाटील, सरला पाटील व इतर.


 

 

Tags: #jalgaon jain company news #maharashtra
Previous Post

तंत्रज्ञान, अभ्यासाच्या जोरावर आदर्श लोकप्रतिनिधी घडवा – दीपक करंजीकर

Next Post

चोरीच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

चोरीच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यंदा करवाढ नाहीच : अर्थसंकल्पात ५२ कोटी ४७ लाखांची वाढ
1xbet russia

यंदा करवाढ नाहीच : अर्थसंकल्पात ५२ कोटी ४७ लाखांची वाढ

March 25, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

चोरीच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण

March 25, 2026
जीवरक्षक ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार
जैन कंपनी

जीवरक्षक ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार

March 25, 2026
खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गावठी कट्टा, ८ तलवारींसह अटक
1xbet russia

तंत्रज्ञान, अभ्यासाच्या जोरावर आदर्श लोकप्रतिनिधी घडवा – दीपक करंजीकर

March 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यंदा करवाढ नाहीच : अर्थसंकल्पात ५२ कोटी ४७ लाखांची वाढ

यंदा करवाढ नाहीच : अर्थसंकल्पात ५२ कोटी ४७ लाखांची वाढ

March 25, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

चोरीच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण

March 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon