• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जीपचा टायर फुटून भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 16, 2021
in अपघात, महाराष्ट्र
0

सोलापूर (वृत्तसंस्था) – अक्कलकोटहून सोलापूरला जाणाऱ्या जीपचा भीषण अपघात झाला आहे. जीपचा टायर फुटल्याने हा अपघात झाला आहे.

हा अपघात इतका भीषण होता की अपघातात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवेसी जखमी झाले आहेत. या अपघातात 10 ते 15 प्रवाशी जखमी झाले आहेत. या अपघातानंतर जखमींना तात्काळ उपचारासाठी सोलापूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहेत.

जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताच्या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, अक्कलकोटहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या क्रुझर जीपचा टायर फुटला. गाडीचा टायर फुटल्याने जीप पलटली आणि हा अपघात झाला आहे. या अपघातात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

तर अनेकजण जखमी झाले आहेत. जीपचा टायर नेमका कशामुळे फुटला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये. मात्र, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते बाबा मिस्त्री यांनी आरोप केला आहे की, एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेल्या संपामुळे प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जीपचा आधार घ्यावा लागत आहे. तसेच जीप चालकही प्रवासी संख्येहून अधिक जणांना गाडीत बसवत प्रवास करत आहेत.

यामुळेच हा अपघात घडला आहे. अपघातानंतर रुग्णवाहिकाही त्वरित उपलब्ध झाली नाही. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आम्ही जखमींना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असंही बाबा मिस्त्री यांनी म्हटलं आहे. कोल्हापुरात भीषण अपघात, स्फोट होऊन 200 मीटर दरीत कोसळली कार गेल्या आठवड्यात कोल्हापुरात कारला भीषण अपघात झाला होता.

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल ते मुरगूड रस्त्यावर हा अपघात झाला होता. अपघातानंतर गाडी थेट दरीत कोसळली. या अपघातात कारने पेट घेतला आणि यामध्ये एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कागल – मुरगूड रस्त्यावर वाघजाई घाडात हा अपघात झाला आहे. सकाळी धावत्या कारमध्ये एक स्फोट झाला आणि त्यानंतर ही गाडी थेट दोनशे मीटर दरीत जाऊन कोसळली असं बोललं जात आहे. यामुळे कारने पेट घेतला आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 10 दिवसांपूर्वी माळशेज घाटात भीषण अपघात कल्याण-नगर महामार्गावरील माळशेज घाटात एका कारला 10 दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला होता.

चालकाचं कारवरील नियंत्रण सुटून कार थेट दरीत कोसळली आहे. या दुर्दैवी घटनेत एक महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील अन्य सहा जण गंभीर जखमी झाले होते. कार दरीत कोसळल्यानंतर कारने पेट घेतल्याचं देखील प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. मोरोशी येथील भैरवगडावर ट्रेकिंगसाठी आलेल्या काही औरंगाबादच्या तरुणांनी जखमींना बाहेर काढलं आहे. या घटनेची माहिती टोकावडे पोलिसांना देण्यात आली आहे.


 

 

Previous Post

उत्तर प्रदेशात सप , बसपचे १० आमदार भाजपने फोडले

Next Post

पूजा दादलानीमुळे समीर वानखेडेंच्या वसुलीची चौकशी थांबली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पूजा दादलानीमुळे समीर वानखेडेंच्या वसुलीची चौकशी थांबली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डीपीडीसीतून जळगाव जिल्हा 100% अंगणवाडी इमारती देणारा पहिला जिल्हा ठरणार – पालकमंत्र्यांचा विश्वास
1xbet russia

डीपीडीसीतून जळगाव जिल्हा 100% अंगणवाडी इमारती देणारा पहिला जिल्हा ठरणार – पालकमंत्र्यांचा विश्वास

March 20, 2026
आ.किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’चा रविवारी शुभारंभ
1xbet russia

आ.किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’चा रविवारी शुभारंभ

March 20, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त
1xbet russia

नगरसेवकाच्या घरात चोरट्यांचा हैदोस, लाखोंचा ऐवज लंपास

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट
जैन कंपनी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डीपीडीसीतून जळगाव जिल्हा 100% अंगणवाडी इमारती देणारा पहिला जिल्हा ठरणार – पालकमंत्र्यांचा विश्वास

डीपीडीसीतून जळगाव जिल्हा 100% अंगणवाडी इमारती देणारा पहिला जिल्हा ठरणार – पालकमंत्र्यांचा विश्वास

March 20, 2026
आ.किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’चा रविवारी शुभारंभ

आ.किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’चा रविवारी शुभारंभ

March 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon