अमळनेर ;- येथील सीसीआयचे शासकीय कापूस खरेदी केंद्र असलेल्या ढेकू रोडवरील लामा जिनिंगला रविवारी सकाळी अचानक आग लागून हजारो क्विंटल कापूस जळून खाक झाला.
या आगीत दाेन खाजगी वाहने अडकली होती मात्र तरूणांचे मदतीने ती बाहेर काढण्यात आली आग आटोक्यात आणण्यासाठी अमळनेरसह पारोळा धरणगाव चोपडा पालीकेच्या अग्नीशमन दलाच्या गाड्यांनी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.
यात काही खाजगी पाण्याचे ट्रँकरही मदतीला धावले आहेत आग लागल्याचे समजताच जिनिंग मालक जितेंद्र कोठारी बाजार समितीचे सभापती प्रफूल्ल पवार नगरसेवक विवेक पाटील आदींनी धाव घेतली अजूनही आग पूर्णपणे आटोक्यात आली नसून त्यासाठी प्रयत्न सूरू आहे.
या केंद्रावर दि. २६ अखेर ४०० टोकण द्वारे कापसाचे मोजमाप झाले आहे दि. २७ पासून सर्वच केंद्रांवरील कापूस खरेदी पणण संघाने बंद करण्याचे सुचित केले होते तर आज रविवारही असल्याने जीनींग बंद होती