जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील तीन गुन्हेगारांना स्थानबद्ध करणेबाबत जळगाव जिल्हा पोलीस दलाने जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जामनेर जिल्ह्यातील पहूर, जळगाव तालुक्यातील भोलाणे आणि भुसावळ येथील गुन्हेगाराला एमपीडीए कायद्यांअंतर्गत स्थानबद्ध केले आहे.
जळगाव तालुका पो. स्टे. हद्दीतील गुन्हेगार राकेश मधुकर कोळी (वय २७ रा. भोलाणे ता.जि. जळगाव) याचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदयाअंतर्गत ०६ गुन्हे दाखल आहेत. तर पहूर पो. स्टे. हद्दीतील गुन्हेगार हुसेन सरदार तडवी (वय ४३ रा. चिलगाव ता. जामनेर) याचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदयाअंतर्गत १६ गुन्हे दाखल आहेत.
वरील दोन्ही इसमाविरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले व औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विना परवाना प्रदर्शन व्यक्ती (व्हिडीओ पायरेट) वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबतचा अधिनियम अंतर्गत दि ११ व दि २१ फेब्रुवारी २४ रोजी प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचे कडेस सादर करण्यात आला होता. त्यानुसार गुन्हेगार राकेश कोळी यास मध्यवर्ती कारागृह, छ. संभाजीनगर येथे तर हुसेन तडवी यास मध्यवर्ती कारागृह, ठाणे येथे दाखल करण्यासाठी रवाना करण्यात आले आहे.
भुसावळ बाजारपेठ पो. स्टे, हद्दीतील स्थानबध्द गुन्हेगार सुरज अशोकराव भोगे ऊर्फ भांगे (वय २४ रा.पापा नगर, राणी मोहल्ला, भुसावळ) याचेविरुध्द भारतीय दंड संहिता कायदया अंतर्गत ०७ गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्हेगार मध्यवर्ती कारागृह, मुंबई येथे दाखल करण्याची कार्यवाही करीत आहेत. वरील एम.पी.डी.ए. प्रस्ताव हे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.निरी. किसन नजनपाटील, जळगाव तालुका पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक महेश शर्मा, पहुर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक सचिन सानप, भुसावळ बाजारपेठ पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक गजानन पडघन अशांनी काम पाहिले आहे.