• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जिल्ह्यात उद्यापासून महसूल सप्ताहाचे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 31, 2023
in Uncategorized
0
आदित्य लॉन्सच्या जागेचा वाणिज्य वापर थांबवण्याचे आदेश

नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन

 जळगाव (प्रतिनिधी) – महसूल विभागामार्फत जिल्ह्यात १ ऑगस्ट हा महसूल दिन साजरा करण्याबरोबरच १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत “महसूल सप्ताह” साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

महसूल दिन दि.१ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय महसूल कामे वेळेत पूर्ण करुन त्यानुसार अभिलेख अद्ययावत करणे, वसूलीच्या नोटीस पाठवणे, मोजणी करणे इत्यादी कामे वेळापत्रकानुसार करणाऱ्या अधिकारी – कर्मचाऱ्यांचा आणि महसूल उद्दिष्ट पूर्ण करणारे अधिकारी – कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. दि. २ ऑगस्ट रोजी ‘युवा संवाद’ उपक्रमात जिल्ह्यातील इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तात्काळ निर्गमित करण्यासाठी महाविद्यालयनिहाय शिबीराचे आयोजन केले जाणार आहे. शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती दिली जाणार आहे‌. अनाथ मुलांना अनाथ प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

दि. ३ ऑगस्ट रोजी ‘एक हात मदतीचा’ उपक्रमांतर्गत अवकाळी पाऊस, अतिवृष्टी यामुळे बाधित शेतकरी व नागरिकांना मदतनिधीचे वाटप करण्यात येणार आहे. तालुक्यातील अतिदुर्गम भागात महसूल अदालतीचे आयोजन केले जाणार आहे. दि. ४ ऑगस्ट रोजी ‘जनसंवाद’ उपक्रमात महसूल अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. सलोखा योजनेत गावा-गावातील शेत रस्त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात येणार आहे. आपले सरकार पोर्टलवरील तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहे. ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ हा उपक्रम दि.५ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणार आहे. यात भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या व शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांच्या महसूलविषयक अर्ज तक्रारींचा निपटारा करण्यात येणार आहे.

दि.६ ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील जिल्हयात कार्यरत असलेल्या सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित बाबी निकाली काढण्यासाठी ‘महसूल संवर्गातील सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. दि.७ ऑगस्ट रोजी महसूल सप्ताहा दरम्यान केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेण्यासाठी ‘महसूल सप्ताह सांगता समारंभ’ आयोजित करण्यात आला आहे.

याशिवाय जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयांमध्ये हेल्पडेस्क, हेल्पलाईन तयार करून मदत करण्याकरिता यंत्रणा कक्ष करण्यात येणार आहे. महसूल सप्ताहादरम्यान शासनाचे महत्त्वाचे कायदे, विकास योजना, उपक्रमांना प्रसिध्दी देण्यात येणार आहे. महसूल विभागामार्फत देण्यात येणारे विविध दाखले आणि प्रमाणपत्रे, त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रांबाबतची माहितीपत्रके तयार करून नागरिकांना देण्यात येणार आहेत. या महसूल सप्ताहात महसूल विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी प्रसाद यांनी केले आहे.


 

Tags: https://kesariraj.com/jilhyat-udyapasun-mahsul/
Previous Post

जळगावच्या विद्यार्थ्याची “ऑनड्युटी” विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या

Next Post

धक्कादायक, नगरसेवकांच्या आंदोलनाची कल्पना नेत्यांना नव्हती !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धक्कादायक, नगरसेवकांच्या आंदोलनाची कल्पना नेत्यांना नव्हती !

धक्कादायक, नगरसेवकांच्या आंदोलनाची कल्पना नेत्यांना नव्हती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !
1xbet russia

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
1xbet russia

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025
कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट
1xbet russia

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon