जळगाव ( प्रतिनिधी ) – राज्याच्या गृहखात्याने गणेश मंडपात प्रत्यक्ष गणेश मूर्तीचे दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे आणि मास्क व सॅनिटायझर वापराचे नियम बंधनकारक केलेले असले तरी जिल्ह्यात समक्ष मंडपात जाऊन गणेशाचे दर्शन घेण्यास मनाई करण्यात आली आहे.
यासंदर्भात अपर जिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी आज जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की गणेश मूर्तीचे मुखदर्शन किंवा अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन मुखदर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात येत असून दर्शन केवळ ऑनलाईन किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे उपलब्ध करून देण्यात यावे पूर्ण गणेशोत्सवाच्या काळात मदत व पुनर्वसन , आरोग्य , पर्यावरण , वैद्यकीय शिक्षण आणि संबंधित महापालिका , पोलीस , स्थानिक प्रशासन यांनी जारी केलेल्या आदेशांचे पालन करण्यात यावे.