जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा प्रशासनाकडून आज प्राप्त झालेल्या कोरोना अहवालात दिवसभरात एकही बाधीत रूग्ण आढळून आलेला नाही. चार रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली .

जळगाव जिल्ह्यात आज एकही रूग्ण आढळून आलेला नाही. आज चार रूग्ण बरे झाल्याने आता ॲक्टीव्ह रूग्ण १२ राहिले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार बाधित रूग्ण आढळून आले होते. त्यापैकी १ लाख ४० हजार रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. २ हजार ५७५ रूग्ण उपचारादरम्यान मृत्यू झाला अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली.







