जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात सोमवारी दि. १० जानेवारी २०२२ रोजी दिवसभरात ८० बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर एक बाधित रूग्ण बरा होवून घरी परतला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
जळगाव शहर- १३, जळगाव ग्रामीण-४, भुसावळ -२५, अमळनेर-२, चोपडा-२५, यावल-१, जामनेर-१, रावेर-४, मुक्ताईनगर-४ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण ८० बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४३ हजार ३८६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २५५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या ५५२ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे.