वोटिंग मशीन एसटीद्वारे रवाना
जळगाव (प्रतिनिधी) : – विधानसभेकरीता भुसावळ येथून सोमवार दि. २१ रोजी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात वोटिंग मशीन एसटीद्वारे पाठवण्यात आल्या. भुसावळ, रावेर या ठिकाणी निवडणुकीचा आढावा घेऊन त्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र भरण्याची सुविधा आदींची पाहणी करून विविध विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सोमवार दि.२१ ला दुपारी १२ वाजेच्या सुमारास भुसावळ येथे प्रांत कार्यालय या ठिकाणी निवडणुकीची आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार नीता लबडे, डीवायएसपी कृष्णांत पिंगळे हे उपस्थित होते. बैठकीप्रसंगी नामनिर्देशन पत्र भरण्यात येणाऱ्या परिसराची १०० मीटर रेषापर्यंत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली व कडक बंदोबस्त करण्यात आला. नामनिर्देशन पत्र व इतर कागदपत्र तपासणीसाठी लावण्यात आलेले टेबल आदींची पाहणी करून सुचना करण्यात आल्या.
मतदान केंद्रावर उमेदवार आणि कार्यकर्त्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्याच्या देखील सूचना करण्यात आल्या. उमेदवारांनी वाहने आणली असता त्यांना पार्किंगची जागेची पाहणी करण्यात आली. त्यानंतर रावेर या ठिकाणी देखील निवडणुक आढावा बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. सकाळपासूनच भुसावळ येथील कार्यालयातून अकरा विधानसभा क्षेत्रांमध्ये वोटिंग मशीन टेस्टींगद्वारे त्या त्या ठिकाणी पाठवण्यात आले आहेत. संपूर्ण यंत्रणा तपासणी करण्यात येऊन विधानसभा क्षेत्राच्या ठिकाणी पाठविण्यात आले आहेत.