जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी कार्यालयात आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) रविंद्र भारदे, तहसीलदार जितेंद्र कुंवर, नायब तहसीलदार अमित भोईटे, अव्व्ल कारकुन आर. एस. पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.







