जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्याचे आजचे एकूण उत्पन्न ७६ हजार कोटी आहे. ते १ लाख कोटी करण्यासाठीचा नियोजन आराखडा सांगितला. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ‘लँड बँक’ आहे. जिल्ह्यात ‘दाळ मिल’, प्लॅस्टिक, शेतीपूरक उद्योगांना मोठा वाव असल्याचे सांगून जिल्ह्यात पिक विम्याचे पिक, फळ विम्याचे १५०० कोटी रुपये आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
जळगाव जिल्ह्यातील उद्योजकांसाठी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद गुरुवारी दिनांक १ ऑगस्ट रोजी जळगावला पार पडली. त्यावेळेला ते बोलत होते. सालगुडी येथे केळीसाठी फिडर करण्याची योजना असून त्यासाठी दर दिवशी ४८ टन केळी लागणार आहे. जळगावमध्ये गोल्डन हब बनण्याची क्षमता आहे, आता विमानसेवाही हैद्राबादशी कनेक्ट झाली आहे. त्यामुळे गोल्डन हब होण्यासाठी लागणारी मदत शासन, प्रशासन स्तरावर करता येईल. तसेच आपला जिल्हा कापूस उत्पादनातील महत्वाचा जिल्हा आहे पण हेक्टरी उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे. हेक्टरी उत्पादन १०० क्विंटल होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करणे सुरु आहे, अशी अभ्यासपूर्ण मांडणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उद्योजकांना केली.