• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

जिल्हा परिषदेचे “मिशन संजीवनी” अभियान : बांधकाम कंत्राटदारांना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 3, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जिल्हा परिषदेचे “मिशन संजीवनी” अभियान : बांधकाम कंत्राटदारांना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य

मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचा निर्णय

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील वाढते तापमान, पर्यायाने पर्यावरणात होणारे बदल, वाढते कॉंक्रिटीकरण यामुळे दिवसेंदिवस भूजल पातळीत मोठ्या प्रमाणावर घट दिसत आहे. भूजल पातळीत झपाट्याने होणारी घट हा चिंतेचा विषय बनला असून होणारी घट भरून काढण्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून जळगाव जिल्हा परिषदेच्या वतीने ” मिशन संजीवनी” हे अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच आता जळगाव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या प्रत्येक मंजुरी आदेशात ” रेन वॉटर हार्वेस्टिंग” करणे हा विषय सक्तीचा करण्यात येणार आहे.

जळगाव जिल्ह्यात देखील दरवर्षी उन्हाळ्यात भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाई सारख्या भिषण समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागते. जिल्ह्यातील अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो तर  अनेक ठिकाणी विहिरी अधिकृत करून देखील पाण्याची मोठी समस्या जाणवते यावर मात करण्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेने “मिशन संजीवनी” अभिनव संकल्पना अमलात आणण्याचे निश्चित केले आहे.  मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांच्या अभिनव संकल्पनेतून” मिशन संजीवनी”ची मुहूर्तमेढ होणार आहे. जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागांकडून ग्रामीण भागात विविध विकास योजनांद्वारे लोकपयोगी इमारतींचे बांधकाम होत असते.

यात प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, शाळा इमारत खोली बांधकाम, समाज मंदिरांचे तसेच ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम, सभागृह, सभा मंडप यासारखे विविध बांधकाम करण्यात येतात. यासारख्या कामांना मंजुरी देताना किंवा प्रशासकीय मान्यता देताना सदर मंजुरी आदेशात संबंधित इमारतीचे बांधकाम करण्याचा मक्ता जो मक्तेदार घेईल त्यांना शतावर पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्याचे पुनर्भरण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) करण्याचे काम स्वखर्चाने करून देणे बंधनकारक राहणार आहे. या संदर्भातील स्पष्ट बांधकाम मंजुरी आदेशात टाकण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांनी दिले आहेत.

रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या कामाचा कोणताही अतिरिक्त मोबदला दिला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. बांधकामाच्या ठिकाणी मक्तेदाराने रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम न केल्यास बांधकाम पूर्णत्वाची नोंद प्रशासकीय दप्तरी घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट सूचना देखील देण्यात आल्या आहेत. काम पूर्ण झाल्यानंतर इमारतीच्या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्याचे पुरावे छायाचित्र स्वरूपात देयकासोबत जोडण्यात यावे तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग झाल्याची खात्री करूनच देयक पारित करावे असे निर्देश देखील देण्यात आले आहेत. यासोबतच ग्रामपंचायत स्तरावरील निधीतून मंजुरी देण्यात येणाऱ्या इमारत बांधकामांना देखील रेन वॉटर हार्वेस्टिंग १ एप्रिल २०२५ नंतरच्या मंजुरी देण्यात येणाऱ्या ग्रामविकास विभागाच्या नियंत्रणातील प्रत्येक बांधकामास सक्तीचे करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या या अभिनव अभियानामुळे जिल्हाभरातील भूजल पातळीत वाढ होण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे.


Tags: जिल्हा परिषदेचे "मिशन संजीवनी" अभियान : बांधकाम कंत्राटदारांना 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' अनिवार्य
Previous Post

अमळनेरच्या अंबर्षी टेकडीला भीषण आग, हजारो झाडे खाक

Next Post

लांडग्याच्या हल्ल्यात केळी व्यापारी जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
लांडग्याच्या हल्ल्यात केळी व्यापारी जखमी

लांडग्याच्या हल्ल्यात केळी व्यापारी जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !
1xbet russia

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

June 1, 2025
बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली
1xbet russia

महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगल पोत लांबवली

June 1, 2025
स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान
1xbet russia

स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान

June 1, 2025
राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  
1xbet russia

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  

June 1, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

June 1, 2025
बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली

महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगल पोत लांबवली

June 1, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon