जळगाव ( प्रतिनिधी ) – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली .
या बैठकीत जिल्ह्यात डिसेंबर अखेर झालेल्या सरकारी खर्चाचा आढावा घेण्यात आला . सर्वसाधारण ४०० कोटी रुपयांची तरतूद जिल्ह्यासाठी आहे . त्यापैकी ८९. टक्के रक्कम आतापर्यंत खर्च झाली आहे . अनुसूचित जाती – जमातींच्या योजनांसाठी आलेल्या ८९ कोटी ७० लाखांच्या निधीपैकी ७० कोटी २० लाख रुपये आतापर्यंत खर्च झाले आहेत . आदिवासी उप घटक योजनांसाठी आलेल्या ८४ कोटी ४७ लाखांच्या निधीपैकी २० कोटी ६३ लाखांचे वितरण करण्यात आले आणि २० कोटी १५ लाख रुपये खर्च झाले आहेत . उर्वरित जवळपास ५० टक्के निधी येत्या मार्च अखेरपर्यंत खर्च करावा लागणार आहे , अशी माहिती या बैठकीत देण्यात आली .
या बैठकीत आजारपणामुळे आमदार चंद्रकांत पाटील गैरहजर होते . पालकमंत्री गुलाबराव पाटील , जिल्हाधिकारी अभिजित राऊत , आमदार शिरीष चौधरी , आमदार अनिल भाईदास पाटील , आमदार किशोर पाटील या बैठकीत उपस्थित होते.