जळगावातील घटना, तरुणाकडून २ पेन ड्राईव्ह जप्त
जळगाव (प्रतिनिधी) :- मध्यरात्रीच्या सुमारास कारागृहातील टीव्हीला पेन ड्राईव्ह जोडून ब्लू फिल्म पाहणाऱ्या बंदीवर कारागृह पोलिसांनी कारवाई केली. ही घटना दि. २६ ऑक्टोंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी कारागृहातील बंदी राहुल भरत भट याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारागृहात खूनातील संशयित राहुल भरत भट हा गेल्या दीड वर्षापासून न्यायालयीन कोठडीत असून कारागृहातील बॅरेक क्रमांक ६ मध्ये ठेवण्यात आले आहे. दि. २६ ऑक्टोंबर रोजी पहाटे एक वाजेच्या सुमारास तुरुंग अधिक्षक सचिन चिकणे हे संचारफेरी करीत होते. (केसीएन)यावेळी त्यांना सव्वा वाजेच्या सुमारास तिची सुरु असल्याचे बैरेक ६ मध्ये दिसले. त्यांनी बंदीला टीव्हीला पेन ड्राईव्ह लावून त्यावर अश्लील चित्रफीत बघत असल्याचे त्यांना दिसले. दरम्यान, बॅरेकमधील बंदी राहूल भट हा टीव्हीच्या मागे हात टाकून काहीतरी काढतांना शिपायांना दिसला.
कारागृह अधीक्षक यांनी बंदी राहुल भट याची चौकशी केल्यानंतर त्याने त्याच्या उशीमधून दोन पेनड्राईव्ह काढून दिले. (केसीएन)कारागृह पोलिसांनी ते जप्त केले असून कारागृह शिपाई दिनेश दत्तू बारी यांनी सोमवारी मध्यरात्री जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार बंदी राहुल भरत भट याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.