जिल्हा एड्स नियंत्रण विभागातर्फे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन उत्साहात
विद्यार्थी विद्यार्थिनींसह अधिकाऱ्यांनी दाखवला उत्साह
जळगाव ( प्रतिनिधी ) – आंतरराष्ट्रीय युवा दिन २०२३ चे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रात युवापिढीमध्ये एचआयव्ही / एड्स विषयी विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करण्याच्या उददेशाने जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, जळगाव, कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ, जळगाव, ऑथलेटिक असोसिएशन, जळगाव यांचे संयुक्त विदयामाने दि. ०२ सप्टेंबर रोजी सकाळी सागर पार्क, जळगाव येथे मॅरेथॉन स्पर्धा १७ ते २५ वयोगातील महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थीनी करिता आयोजित करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये ऑनलाईन प्रवेश विनामुल्य ठेवण्यात आला होता. मैरेथॉन स्पर्धेचा मार्ग सागर पार्क, काव्यरत्नावली चौक, महाबळ चौक, छ. संभाजी नगर चौक, संत गाडगेबाबा चौक येथून परत सागर पार्क असा ५ किमीचा ठेवण्यात आला होता.
सदर स्पर्धेमध्ये विद्यार्थी- विद्यार्थीनी यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. सकाळी ७.२० वाजता स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांचे हस्ते हिरवा झेंडा दाखवून तसेच प्रा. राजू धनवाड, प्रा. विजय पाटील यांचे उपस्थितीत स्पर्धेस सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला प्रास्ताविकमध्ये जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहुरकर यांनी आंतरराष्ट्रीय युवा दिन व स्पर्धेबद्दल उपस्थित विद्यार्थी विद्यार्थीनी याना मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थी गटाच्या व विद्यार्थीनी गटाच्या मॅरेथॉन स्पर्धेस सुरुवात करण्यात आली.
सदर स्पर्धेमध्ये विद्यार्थी गटात प्रथम क्रमांक- दिनेश साजन वसावे (मुलजी जेठा महाविद्यालय,जळगाव) रु. २५००/- व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक सुनील रामदास बारेला रू.१७५०/- व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक मुकेश रमेश धनगर (बाहेती महाविद्यालय, जळगाव) रू. १०००/- व प्रमाणपत्र आणि विद्यार्थीनी गटात प्रथम क्रमांक जानवी संजय – रोझोदे (संस्कृती महाविद्यालय, जळगाव ) रू. २५००/- व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक – अश्विनी सुनील बारेला (पी ओ नाहाटा महाविद्यालय, जळगाव) रू. १७५०/- व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक अंकिता केशवलाल कसदेकर (नूतन मराठा महाविद्यालय जळगाव) – रू.१०००/- व प्रमाणपत्र जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहुरकर यांचे हस्ते देण्यात आले. सहभागी सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी याना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
सदर स्पर्धा यशस्वी करणेसाठी जिल्हा सहा. कार्यक्रम गिरीश गडे, समुपदेशक मनीषा वानखेडे, प्रशांति पाटील, दीपाली पाटील, विजय शिरसाठ, नामदेव पाटील, प्रयोगशाळा तंत्रज्ञ – उज्वला पगारे, मिलन वाघोदेकर, सुवर्णा साळुंखे, शहर वाहतूक शाखाचे हंसराज देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल सुशील चौधरी, उमेश पवार, दीपक वंजारी रमेश अहिरे, नाईक प्रवीण भोसले, अथलेटिक असोसिएशन, जळगाव- निलेश पाटील, नितीन पाटील,विजय रोकडे, वसीम मिर्झा, देवानंद पाटील, समीर घोडेस्वार, सचिन महाजन, जितेंद्र शिंदे, योगेश सोनवणे, प्रा. इकबाल मिर्झा, जळगाव जिल्हा नियंत्रण विभागांतर्गत असलेले क्षेत्रीय कार्यकर्ता राजेश्वर पाटील, पवन सनान्से, नितेश चव्हाण, भूषण पाटील यांनी परिश्रम घेतले.