२७९ उमेदवारांच्या यादीसाठी कक्षासमोर ठिय्या आंदोलन

जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर जी सही करावी लागते त्यासाठी त्यांनी ५० हजार रुपये मागितले असा आरोप माधुरी अत्तरदे आणि चंद्रशेखर अत्तरदे यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. २८० उमेदवारांची यादी मिळावी म्हणून जि प सदस्य माधुरी अत्तरदे यांनी समर्थकांसह या कक्षात ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
आता आम्ही हायकोर्टात जाऊ आणि जिल्हाधिकाऱ्यांकडेही दाद मागू असेही त्यांनी सांगितले . राजकारण्यांनी कीड लावलेली ही निवडणूक प्रक्रिया असू प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी आम्ही कोर्टात करणार आहोत सर्व २८० उमेदवारांच्या नावांची यादीही आम्हाला देण्यास अधिकारी नकार देत असल्याने आम्ही दिवसभर ठिय्या मांडू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला यावेळी चंद्रशखर अत्तरदे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर आरोप करीत अत्यंत संतापात बिडवई अत्यंत भ्रष्टाचारी असल्याचे सांगितले आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील आम्ही येथून हटणार नाही असेही ते म्हणाले.
जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडवणाऱ्या या आरोपाने आश्चर्य व्यक्त होत आहे . माधुरी अत्तरदे यांचे समर्थक मोबाइलमधून हा सगळं घटनाक्रम टिपत असल्याने लगेच सगळीकडे तो व्हायरल होत आहे. माधुरी अत्तरदे आणि चंद्रशेखर अत्तरदे यांनी थेट व जाहीर आरोप केल्याने ही प्रशासनाची काळी बाजू समोर आल्याचे बोलले जात आहे आता या वादात जिल्हाधिकारी काही हस्तक्षेप करतील का , हे महत्वाचे ठरणार आहे या निवडणूक प्रक्रियेवर जिल्ह्यातील प्रस्थापित राजकारण्यांचा दबाव आहे असा जाहीर आरोप अत्तरदे यांनी केल्याने या वादाचे गांभीर्य वाढले आहे.







