जळगाव ( प्रतिनिधी ) – जिजाऊनगरात बंद घर फोडून चोरट्यांनी दागिने आणि रोकड असा ४३ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दिनेश लखारा (वय-३५, रा. जिजाऊ नगर, आव्हाणे शिवार ) हे कुटुंबियासह राहतात. सोनारकाम करून उदरनिर्वाह करतात. २८ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर दरम्यान ते दिवाळी निमित्त गावाला गेले होते. बंद घर पाहून संधी साधत कडी कोयंडा तोडून ३७ हजार ६०० रूपयांचे दागिने आणि ६ हजार रूपयांची रोकड असा ४३ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे २९ नोव्हेंबर रोजी उघडकीला आले दिनेश लखारा यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तपास पोहेकॉ सतिश हाळनोर करीत आहेत.