नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – भजन सम्राट अनूप जलोटा आपल्या भावगीतांसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र आता ते वेगळ्या कारणांसाठी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बिगबॉसमध्ये आपली शिष्य जसलीन मथारूसोबत त्यांच नाव जोडलं गेलं होतं. त्यावेळी ते दोघे लग्न करणार असल्याच्या बातम्या देखील समोर येत होत्या. मात्र इतक्या वर्षात त्यांचं लग्न काही झालं नाही. पण आता नुकताच त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोत जसलीन नवरीच्या रूपात आणि अनूप जलोटा हे नवरदेवाच्या रूपात दिसत होते. त्यामुळं या दोघांनी लग्न केलं कि काय असा सवाल सोशल मिडीयातून उपस्थित केला जात होता. त्यानंतर अनुप जलोटा यांनी यावर स्पष्टीकरण दिल आहे.
या फोटोविषयी अनुप जलोटा यांनी स्पष्टीकरण देताना जसलीनसोबतच्या लग्नाच्या चर्चांना खोट्या आणि निराधार असल्याचं म्हटलं आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. याविषयी अधिक माहिती देताना जलोटा म्हणाले कि,जसलीनची मॉडर्न ड्रेसिंग आमच्या परिवाराला चालणार नाही. आम्ही धोतर-कुर्ता घालणारी माणसे आहोत. भक्ती भजन गातो. जसलीन ते कसं मॅच करू शकेल. मला वाटतं माझ्या आजूबाजूच्या लोकांना जसलीनचा तो अंदाज योग्य वाटत नाही. त्यांनी जोर देऊन सांगितले की, जर ते ३५ वर्षांचेही असते तरी त्यांनी जसलीनसोबत लग्न केलं नसतं. त्यामुळं त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
या फोटोविषयी बोलताना त्यांनी सांगितले कि, अशा लोकांना काय म्हणावं जे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजला खरं मानतात. हा फोटो खोटा असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितले. हा आमच्या एका सिनेमातील फोटो असल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. अनुप जलोटा जसलीनसोबत ‘वो मेरी स्टुडंट’ मध्ये दिसणार आहेत. या सिनेमात अनूप जसलीनच्या वडिलांची भूमिका साकारत आहे. हा फोटो या सिनेमातील असल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.