मुंबई (वृत्तसंस्था) – मुंबईसह आसपासच्या शहरांमधील वीज पुरवठा खंडित झाला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीतील वीज पुरवठा खंडित झाल्यानं ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय अनेक लोकलदेखील थांबल्या आहेत.ग्रीड फेल झाल्यानं बत्ती गुल झाल्याची माहिती मिळत आहे. वीज पुरवठा सुरळीत होण्यास किमान एक तासाचा अवधी लागू शकतो.
याचसंदर्भात काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जनतेला संयम ठेवण्याचं आवाहन केलं आहे. आव्हाड यांनी मुंबई, ठाणे, पनवेल, नवी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर ट्विटरवरुन यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ‘मुंबई तसेच ठाणे व आसपासच्या परिसरातील वीज पुरवठा काही तांत्रिक खारणांमुळे तात्पुरता खंडित झाला असून त्यावर दुरुस्तीकरीता तातडीने पावले उचलली जात आहेत. जनतेने संयम ठेवून सहकार्य करावे ही विनंती,’ असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.