• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

महाराष्ट्र जनक्रांती मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 18, 2022
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी ) – राजस्थान मधील जालोर येथे इयत्ता तिसरीचे शिक्षण घेणाऱ्या इंद्रा मेघवाल या विद्यार्थ्याच्या हत्येचा व धरणगाव येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांचे करण्यात आलेले शुद्धीकरण या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे निदर्शने आंदोलन व घोषणाबाजी करून आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला . या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मुकुंद सपकाळे , धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंद नन्नवरे , छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष अमोल कोल्हे , संजय सपकाळे यांनी केले .

राजस्थान येथे जालोर या गावी शाळेत अनुसूचित जातीच्या दलित विद्यार्थ्याने सवर्ण शिक्षकाच्या पाण्याच्या टाकीतून पिण्यासाठी पाणी घेतले , दलित विद्यार्थ्याने पाण्याच्या टाकीला स्पर्श केला व तो अस्पृश्य आहे असे मानुन पाणी बाटले म्हणुन शिक्षकाने इंद्रा मेघवाल या विद्यार्थ्याला बेदम व जबर मारहाण केली त्यामुळेच विद्यार्थ्याचा मृत्यू झाला . या घटनेचा आंदोलकांनी तीव्र निषेध व्यक्त करत , त्या मारेकरी शिक्षकास फाशीची शिक्षा करा अशी मागणी महामहिम राष्ट्रपती महोदया यांना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यामार्फत निवेदन देऊन केली .

तसेच मा. ना. गुलाबराव पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना वंदन करून पुष्पहार अर्पण केला व स्पर्श केला म्हणून शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख गुलाबराव वाघ आणि धरणगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी पुरोहितांकडून पूजाविधी करत मंत्रोच्चारण करून दोन्ही पुतळ्यांचा दुग्धाभिषेक करून , दोन्ही पुतळ्यांवर गोमूत्र शिंपडले व शुद्धीकरण केले . सदर कृती अतिशय निंदाजनक असुन अंधश्रद्धा व अस्पृश्यता पसरवणारी आहे . ही घटना अंधश्रद्धा विरोधी व अस्पृश्यता विरोधी कायद्याचे उल्लंघन व भंग करणारी घटना आहे , म्हणुन संबंधित इसमांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी देखील आंदोलकांकडून करण्यात आली .

सदर आंदोलनात रमेश सोनवणे , चंदन बिऱ्हाडे , महेंद्र केदारे , सुरेश तायडे , साहेबराव वानखेडे , दिलीप सपकाळे ,भारत सोनवणे , वाल्मीक सपकाळे , आनंदा तायडे , दादाराव शिरसाठ , प्रणय नन्नवरे , प्रा. प्रीतीलाल पवार , उमेश गाढे , विवेक जावळे, ऍड . राजेश गोयर , यशवंत घोडेस्वार , मिलिंद सोनवणे , चंद्रकांत नन्नवरे , बाबुराव वाघ , युवराज सुरवाडे , गुलाब कांबळे , सुभाष साळुंखे , आबा महाजन , अनिल माळी , लखन पाटील , यश भालेराव , आनंद इंगळे , पंकज नन्नवरे , विलास नन्नवरे , सुभाष नन्नवरे , कल्पेश कोळी , समाधान वाघ , मिलिंद नन्नवरे , प्रकाश मोरे , बंटी नन्नवरे , नाना ठाकरे , भिमराव सोनवणे , रवींद्र सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते .


 

Previous Post

दादावाडी येथील खड्ड्याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

Next Post

जगातील प्रदूषित शहरांमध्ये भारतातील हि दोन शहरे अव्वलस्थानी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जगातील प्रदूषित शहरांमध्ये भारतातील हि दोन शहरे अव्वलस्थानी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात

June 21, 2025
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात

June 21, 2025
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon