जामनेरात ग्लोबल महाराष्ट्र हाँस्पिटलच्या सभास्थळी बॉम्ब ठेवल्याची धमकी ; पोलीसात गुन्हा दाखल
ग्लोबल हॉस्पिटलचे दुपारी झाले होते लोकार्पण
जळगाव /जामनेर (प्रतिनिधी) माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांचे स्विय सहायक दिपक तायडे यांना अज्ञात व्यक्तीकडून मोबाईलवरील आलेल्या धमकीत ग्लोबल महाराष्ट्र हाँस्पिटलच्या सभेच्या ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याच्या आणी मॅसेजद्वारा एक कोटी रूपये खंडणी मागीतल्याच्या घटनेने जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आली आहे. दिपक तायडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आज १३ रोजी बिओटी कॉम्प्लेक्समधे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणविस यांच्या कार्यक्रमाची तयारी सुरू असतांना तायडे यांच्या भ्रमणध्वनीवर दुपारी २ वाजता एक कॉल आला. तो त्यांनी उचलला असता समोरून हिंदीत बोलणाऱ्याने “सभाके चारो
ओर बॉम्ब रखे है,ए बात आपको बता देता हु,आपको क्या करना है ये देखो । तर ३ वाजुन १८ मिनीटांनी टेक्स मॅसेज आला.
त्यात ईंग्रजी शब्दात हिंदी मजकुर असा, पाच बजेतक एक करोड भेज दे,महाजन को बोलदे, नही तो बहुत बडा धमाका हो जाएगा, मालेगांवमे मेरे आदमी खडे है,नही तो तुम्हारी मर्जी ।
असा मजकुर आहे,असे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत कार्यक्रम संपल्यानंतर जामनेर पोलीस स्टेशनमध्ये दिपक तायडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप ईंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून किशोर पाटील हे तपास करीत आहे.