जामनेर येथे मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती
जामनेर (प्रतिनिधी) : येथे देशभक्तीपर वातावरणात शहरात बुधवार दि. १४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. तिरंगा पदयात्रा ही जळगाव रोड, मार्केट कमेटी ते गांधी चौक अशी काढण्यात आली.
पदयात्रेत राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज मंत्री गिरीश महाजन तहसील कर्मचारी, पंचायत समिती कर्मचारी, वन विभाग कर्मचारी, नगरपरिषद कर्मचारी व सर्व सरकारी कर्मचारी तिरंगा पद यात्रेत उपस्थित होते. या तिरंगा यात्रेत इंदिराबाई ललवाणी हायस्कुल, न्यू इंग्लिश स्कुल, एकलव्य माध्यमिक तसेच विविध शाळेतील विद्यार्थी यांच्यासह जामनेरमधील नागरीकानी सुद्धा सहभाग नोंदवला. समारोप गांधी चौक येथे शालेय विद्यार्थी यांनी देशभक्तीपर गीत सादर करून झाला.
तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा अभियान राबवावे असे आवाहन गिरीश महाजन यांनी नागरिकांना केले. समारोप राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत गात करण्यात आला.