जामनेर (प्रतिनिधी) : येथे परंपरेनुसार रावण दहनाचा कार्यक्रम उत्साहात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पार पडला. रावण दहनाचे यंदा ५२ वे वर्ष व ५१ फूट रावणाचा पुतळा दर वर्षाप्रमाणे उभारण्यात आला होता. श्रीराम पेठ भागातील प्रभू श्रीरामाचे मंदिरातून दर्शन घेऊन हाती मशाल घेऊन गिरीश महाजन हे बैलगाडीतुन दसरा मैदान येथे आले. रावण दहन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले. या ठिकाणी प्रमुख उपस्थिती जितेंद्र पाटील, महेंद्र बाविस्कर, चंद्रकांत बाविस्कर, शिवाजी सोनार, मुकुंदा माळी, निलेश चव्हाण, शरद पाटील, नवल पाटील, नाजीम पार्टी, अनिस शेख, खलील भांजा तसेच जामनेरकरांची उपस्थिती होती.