आदिवासी गरजू विद्यार्थ्यांना पत्रकारातर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
जामनेर (प्रतिनिधी) : सामाजिक बांधिलकीच्या नात्याने आपणही समाजाचे काही देणे लागतो या उदात्त भावनेतून जामनेर येथील प्रामाणिक व समाजसेवी पत्रकार बांधवांनी एकत्र येत गुरुवारी दिनांक ४ जुलै रोजी गोविंद महाराज नगर येथील जिल्हा परिषद शाळेत गरजू आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले ही उल्लेखनीय बाब असल्याचे मनोगत नगरपालिकेचे माजी उप नगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर यांनी व्यक्त केले.
यावेळी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील तसेच जामनेर न.प.चे माजी उपनगराध्यक्ष महेंद बाविस्कर, जिकरा शिक्षण संस्थेचे सचिव जाकिर शेख यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी महेंद बाविस्कर यांनी, प्रामाणिक पत्रकार हा फक्त आपल्या परीसरातील घडामोडी जगाच्या समोर मांडत नसुन तो समाज मनाचा आरसा असतो, असे सांगितले.
सुमारे १०० विद्यार्थ्यांना या शैक्षणिक साहित्याचे वाटप यावेळी करण्यात आले. यावेळी पत्रकार सुनिल इंगळे,अनिल शिरसाठ, नितीन इंगळे, देविदास विसपुते, किरण चौधरी, सागर लव्हाळे, बबलु शेख, इम्रान खान, ईश्वर चौधरी, सुनिल सुरवाडे, मनोज दुबे तसेच केंद्र प्रमुख संगिता पालवे, शाळेचे मुख्याध्यापक अनंत अरतकर, खेमराज नाईक यांच्यासह नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.