जामनेर (प्रतिनिधी) : येथे कार्यकाळ पूर्ण झालेले राजमल नामदेव भागवत यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सभापती पदी बेटावद बु येथील अशोक काशिनाथ भोईटे यांची सोमवार दि. ५ ऑगस्ट रोजी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती जामनेरच्या सभागृहात झालेल्या सभापती निवड सभेत माजी सभापती राजमल भागवत, उपसभापती वासुदेव घोंगडे यांचेसह बाजार समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
सभापती पदावरील बिनविरोध निवडीनंतर सर्व सदस्यांनी अशोक भोईटे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या. कृषी उत्पन्न बाजार समिती जामनेरच्या सभापती पदाच्या निवडीसाठी अधयसीन अधिकारी म्हणून जामनेर तालुक्याचे सहाय्यक निबंधक जगदीश बी बारी यांनी कामकाज पाहिले. त्यांचे सह सहाय्यक निबंधक कार्यालयातील एस एस पवार हे देखील उपस्थित होते.
कृषी उत्पन्न बाजार समिती जामनेरच्या सर्वांगीण हितासाठी तसेच समितीशी निगडित सर्व घटकांच्या विकासासाठी काम करणार असल्याची भावना नवनियुक्त सभापती अशोक भोईटे यांनी यावेळी व्यक्त केली. राज्याचे पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी अशोक भोईटे यांचा सत्कार करण्यात आला. तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, तुकाराम निकम, बंटी वाघ, रवींद्र झाल्टे, अतिश झाल्टे, सुनिल कलाल, मांगीलाल गिल यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.