जामनेरात ६ नगरसेवकदेखील बिनविरोध, मंत्री महाजनांची जादू कायम !
जामनेर (प्रतिनिधी) – येथील नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवार साधनाताई महाजन या बिनविरोध निवडून आले आहेत. ही त्यांची आता तिसरी टर्म आहे. तर ६ नगरसेवक देखील बिनविरोध निवडून आल्याने भाजप तर्फे शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
नगराध्यक्ष पदासाठी साधना गिरीश महाजन यांचा एकमेव अर्ज उरला. त्यामुळे त्या बिनविरोध निवडून आल्या. तर प्रभाग क्रमांक ११ ब मधून उज्वला दीपक तायडे, प्रभाग क्रमांक १ अ मधून सपना रविंद्र झाल्टे, प्रभाग क्रमांक १३ अ मधून महेंद्र कृपाराम बाविस्कर, १३ ब मधून किलूबाई गीमल्या शेवाळे, प्रभाग क्रमांक २ मधून श्रीराम महाजन,तर प्रभाग क्रमांक ५ अ मधून संध्या जितेंद्र पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत.









